बंधन एएमसीची गिफ्ट सिटीमध्ये ऑपरेशन्सची सुरुवात   

बंधन एएमसीने आपल्या आयएफएससी शाखेद्वारे गिफ्ट सिटीमध्ये ऑपरेशन्स सुरू केल्याची घोषणा केली आहे. विदेशी नागरिक उदा. फॅमिली ऑफिसेस, सरकारी संस्था, कॉर्पोरेट व संस्थात्मक गुंतवणूकदार, पेन्शन फंड्स, एंडोमेंट फंड्स तसेच अनिवासी भारतीय आता बंधन इंडिया लार्ज अँड मिड-कॅप फंड किंवा बंधन इंडिया स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करून भारताच्या विकासकथेत भाग घेऊ शकतात. पर्यायी रूपाने स्थिर परंतु उच्च दर्जाच्या निश्चित उत्पन्नाच्या फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार बंधन इंडिया गव्हर्नमेंट सिक्युरिटीज फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडू शकतात. बंधन एएमसीचे सीईओ विशाल कपूर म्हणाले, गिफ्ट सिटीमध्ये भारत-केंद्रित आमच्या तीन फंड्सच्या सादरीकरणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आता गुंतवणुकीची सुरुवात करू शकतात. 

Related Articles